Andrea Hewitt : ‘घटस्फोटासाठी अर्ज केला होता पण…’, विनोद कांबळीच्या पत्नीने केला धक्कादायक खुलासा

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये विनोद कांबळी हे नावाजलेले नाव आहे. एकेकाळी विनोद कांबळी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जोडीची मोठ्या प्रमाणात चर्चा असायची. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कार्यक्रमात विनोद कांबळी सर्वांसमोर आला अन् त्याची अवस्था पाहून अनेकांन धक्काच बसला. विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांनी मदतीचे हात देखील पुढे केले होते. सध्या कांबळीवर उपचार सुरू असून तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान विनोद कांबळीच्या पत्नीने म्हणजेच अँड्रिया हेविटने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
काय म्हणाली अँड्रिया हेविट ?
विनोद कांबळीची पत्नी अँड्रिया हेविटने खुलासा केला की तिने 2023 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, पण पतीची ‘असहाय्य अवस्था’ पाहून अर्ज परत घेण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अँड्रिया हेविटने खुलासा केला आहे. तिच्या या खुलाश्याने सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
का मागे घेतला घटस्फोटाचा अर्ज?
तीने घटस्फोटाचा अर्ज का मागे घेतला हेदेखील स्पष्ट केले आहे. मी त्याला सोडले तर तो असहाय्य होईल. तो लहान मुलासारखा आहे आणि त्यामुळे मला खूप त्रास होतो. मला त्याची नेमही काळजी वाटते. मी माझ्यासाठी खूप काही आहे. मी माझ्या मित्राला असं सोडणार नाही, असं अँड्रिया हेविटने म्हटलंय.
अनेकदा असे क्षण येतात, जेव्हा मला त्याची जास्त काळजी वाटते. तो बेडवर नीट झोपलाय की नाही, याची देखील मला चिंता लागून राहिलेली असते, असंही अँड्रिया हेविटने म्हटलंय. या सर्व कारणामुळे मी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.
कशी आहे विनोद कांबळीची लव लाईफ?
विनोद कांबळीची लव लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास त्याची दोन लग्ने झाली आहेत. विनोद कांबळीच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लुईस होतं. नोएला लग्नापूर्वी पुण्यातील ब्ल्यू डायमंड होटेलमध्ये रिसेप्शनिस्टचे काम करायची. कांबळीच्या दारूच्या व्यसनामुळे आणि त्याच्या नव्या अफेयरमुळे त्यांचं नातं तुटलं. त्याचवेळी कांबळीचे अॅंड्रिया हेविटसोबत अफेयर सुरू होतं.
पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर 2006 मध्ये कांबळीने अॅंड्रिया हेविटसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. विनोद कांबळीला दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी आहे. तसेच कांबळीची दुसरी पत्नी अॅंड्रिया हेविट त्याच्या पहिल्या पत्नीच्या संपर्कात असते, असे विनोद कांबळीने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते.
कोण आहे अँड्रिया हेविट?
आंद्रिया हेविट तिच्या काळात खूप लोकप्रिय मॉडेल होती. तिचे फोटो जाहिरातींसाठी मासिकांच्या पहिल्या पानांवर असायचे. अँड्रिया हेविटने तनिष्क ज्वेलरी ब्रँडमधून मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने मुंबईत सौंदर्य सल्लागार म्हणून दीर्घकाळ काम केलं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिने मागच्या काही वर्षांपासून स्वत:ला प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर ठेवले आहे.





