‘…अन् सारा अली खान संतापली’

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या साधेपणा, डाउन टू अर्थ स्वभावमुळे चर्चेत असते. सारा अनेकदा पापाराझी आणि चाहत्यांशी खूप प्रेमाने बोलताना दिसली आहे, परंतु सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती फ्लाइटमध्ये आहे, आणि चुकून तिच्या ड्रेसवर ज्यूस पडल्याने ती रागाने लाल झालेली दिसत आहे. ती एअर होस्टेसकडे पाहत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सारा अली खान गुलाबी रंगाचा ड्रेसमध्ये दिसत आहे. ती बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत असल्याचे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहे. एअर लाइन क्रू मेंबर्स तिच्याभोवती उभे आहे. एअर होस्टेसकडे बघत ती रागाने तिच्या सीटवरून उभी राहते. हा व्हिडिओ एका शूटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. साराच्या वागण्यावरून ती जाहिरात किंवा चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे स्पष्ट होते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, होमी अदजानिया दिग्दर्शित ‘मर्डर मुबारक’मध्ये सारा अली खान दिसली होती. ‘ए वतन मेरे वतन’ही प्रदर्शित झाला आहे. येत्या काळात ती धर्मा प्रॉडक्शन आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या ॲक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदा आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय साराकडे अनुराग बसूच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘मेट्रो देज डेज’ हा चित्रपटही आहे, ज्यात आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख आणि नीना गुप्ता यांच्याही भूमिका आहेत.
============





