अन् थोडक्यात बचावली जान्हवी कपूर; व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण….

मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘जान्हवी कपूर’ बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते.
जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. अश्यातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामध्ये अभिनेत्री व्यायाम करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही थोडक्यात वाचली आहे. जान्हवी कपूर हिचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनाच मोठा धक्का हा बसलाय. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अभिनेत्री जिम मध्ये एक व्यायाम करत असताना तिचा अचानक तोल जातो आणि ती थोडक्यात बचावते. यानंतर जान्हवी हिला देखील धक्का बसतो आणि ती थेट तोंडाला हात लावते.
आता जान्हवी कपूर हिचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला असून, अनेकांनी काळजी घेऊन व्यायाम करण्याचा सल्ला हा जान्हवी कपूर हिला दिला आहे. या व्हिडिओवर नेकतरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘बवाल’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्या सोबत अभिनेता वरून धवन मुख्य भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच वरुण धवन याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना जान्हवी ही दिसत आहे.





