Nitin Gadkari : …अन् मलाही दोन वेळा दंड भरावा लागला होता; मंत्री नितीन गडकरींनी सांगितला सी लिंकचा ‘तो’ किस्सा

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकचे काम मीच केले. या महामागार्वार मलाही एकदा नव्हे तर दोनदा दंड भरावा लागल्याचा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितला आहे. चलानपासून कोणीच वाचू शकत नाही. कॅमरा सगळे काही टिपत असतो. तेव्हा मला 500 रुपयांचा दंड भरावा लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गडकरी म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी मानवी वर्तनात बदल करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रस्ते अपघातातील बहुतेक मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे होतात. दंड भरावा लागल्याबद्दल लोकं बऱ्याच वेळा तक्रार करत असतात, कूरकूर करतात, पण कोणीच नियमांचे उल्लंघन करू नये. दंड हा महसूल निर्माण करण्यासाठी बजावला जात नाही.
गडकरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलशिवाय इतर कोणतीही गाडी खरेदी करा. फ्लेक्स इंजिन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन कार हे भविष्य आहे. मी स्वतः हायड्रोजन कार खरेदी केली आहे. रस्ते टोलमुक्त करण्याच्या धोरणावर काम सुरू आहे, ज्यामुळे टोल भरणाऱ्यांना दिलासा मिळेल. 8-10 दिवसांत त्याची घोषणा केली जाईल. सध्या मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की टोल 100% कमी केला जाईल.
अपघाग्रस्तांना मदत करणाऱ्यांना बक्षीस
हल्ली स्पीड ब्रेकरमुळे स्लिप डिस्कची समस्या उद्भवू शकते आणि वेग तपासण्यासाठी एक नवीन रंग कोड येत आहे. जे कंत्राटदार त्यांचे काम योग्यरित्या करत नाहीत त्यांच्याशी ते कठोरपणे वागतो. जे कंत्राटदार त्यांचे काम योग्यरित्या करत नाही. तर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना राहवीर योजनेअंतर्गत आम्ही 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आम्ही हे देखील कव्हर करण्याचा विचार करत आहोत. जखमींच्या उपचाराचा खर्च आम्ही पंतप्रधानांकडे मागितला आहे, असेही गडकरी म्हणाले.





