…अन् आमिर-अक्षयची टक्कर टळली

मोठ्या कालावधीपासून रुपेरी पडद्यापासून लांब राहिलेले आमिर खान ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येणार आहे. लालसिंह चढ्ढा चित्रपट यंदाच्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. मात्र याचवेळी अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट रिलीज होणार होता. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी अक्षय कुमारने पुन्हा एकदा माघार घेतली आहे.
Sometimes all it takes is one conversation. Thank you to my friends @akshaykumar & Sajid Nadiadwala for their warm gesture of moving the release date of their film Bachchan Pandey at my request. I wish them the very best for their film. Looking forward to it.
Love.
a— Aamir Khan (@aamir_khan) January 27, 2020
आमिर खानच्या विनंतीवर अक्षय कुमारने बच्चन पांडेची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. यासाठी आमिर खानने अक्षयचे आभार व्यक्त केले आहेत. यामुळे दोन्ही चित्रपटांची होणारी टक्कर टळली आहे. याआधीही अक्षय कुमारने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पदमावतसाठी आपल्या चित्रपटाची तारीख बदलली होती.
Sat Sri Akaal ji, myself Laal…Laal Singh Chaddha.? pic.twitter.com/aXI1PM8HIw
— Aamir Khan (@aamir_khan) November 18, 2019
दरम्यान, लालसिंह चढ्ढा चित्रपटात आमिर खानसह करीना कपूर झळकणार आहे. तर बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमार आणि कृती सॅनॉन ही जोडी दिसणार आहे.
Anytime @aamir_khan , we’re all friends here ? Presenting – new look, new release date. Coming on 22nd January, 2021. In and as #BachchanPandey! #SajidNadiadwala @farhad_samji @kritisanon https://t.co/Y75p0bQmaF pic.twitter.com/orZPR6NZYM
— Akshay Kumar (@akshaykumar) January 27, 2020




