‘कॉल मी बे’च्या सीझन 2 मधून अनन्या पांडे पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Ananya Panday | अनन्या पांडेने ‘कॉल मी बे’ या वेबसीरिजद्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण केले होते. तिची वेबसिरिज चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर अनन्या पांडेने तिच्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘कॉल मी बे’च्या सर्व पात्रांची झलक दाखवण्यात आली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमचा दिवस यापेक्षा चांगला नसता. बेला दुसऱ्या सीझनमध्येही तिची जादू दाखवणार आहे. सीझन 2 तयार होत आहे.’
View this post on Instagram
अनन्या पांडेच्या या सीरिजमध्ये गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, निहारिका लिरा दत्त, विहान सामत, मुस्कान जाफरी, लिसा मिश्रा आणि वीर दास यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, अनन्याच्या बेला या पात्राची तुलना ‘कभी खुशी कभी गम’मधील करीना कपूरच्या ‘पू’ भूमिकेशीही केली जाते.
‘कॉल मी बे’ करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झाला आहे. यात अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा आणि करण जोहर कार्यकारी निर्माते आहेत. ‘कॉल मी बे’ वेबसिरिज हिंदी आवृत्ती व्यतिरिक्त तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये पाहता येईल.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘कॉल मी बे 2’ व्यतिरिक्त, अनन्या पांडेकडे अनेक प्रकल्प आहेत. ती ‘CTRL’ चित्रपटात दिसणार आहे. विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ४ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.





