अनन्या पांडेला 500 रुपयांचे बक्षिस

अनन्या पांडेने “स्टुडन्ट ऑफ द इयर 2′ मधून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. तिच्या या पहिल्या सिनेमातल्या कामाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या अनन्या पांडे “पती पत्नी और वो’ या आपल्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शूटिंगदरम्यान अनन्याच्या ऍक्‍टिंगवर खुश होऊन डायरेक्‍टर मुदस्सर अजीज इतके खुश झाले की त्यांनी उत्साहाच्या भरात अनन्याला पाचशे रुपये बक्षीस दिले आहेत. तिच्या आयुष्यात ऍक्‍टिंगबद्दल मिळालेले हे पहिलेच बक्षिस असावे.

“ती पत्नी और वो’च्या शूटींगमध्ये कार्तिक आर्यन बरोबरचा एक सीन आहे. यावेळी अनन्याला कोणताही डायलॉग बोलायचे नव्हते. केवळ कार्तिक आर्यनच्या डायलॉगवर हावभावाद्वारे रिऍक्‍शन द्यायची होती. असे करणे एरवी खूप कठीण असते. पण अनन्याने अगदी सहजपणे हा सीन ओके केला. त्यावर डायरेक्‍टर मुदस्सर अझिझ इतके खुश झाले की त्यांनी पाचशे रुपयांची नोट काढून तिच्या हातात ठेवली, आणि शॉर्ट सुंदर झाला असल्याचेही सांगितले.

“पती पत्नी और वो’ हा संजीव कुमार, परवीन बाबी आणि विद्या सिन्हा यांच्या याच नावाच्या जुन्या सिनेमाचा रिमेक आहे. कार्तिक आर्यन आणि भुमी पेडणेकर हेदेखील अनन्याबरोबर असणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×