Delhi : बुरारीमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू; 12 जण जखमी; बचाव कार्य सुरू

Delhi Building Collapsed | दिल्लीच्या बुरारी भागात एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. मात्र बांधकाम असतानाच ही चार मजली इमारत सोमवारी सायंकाळी कोसळली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर बचावकार्य वेगानं सुरु झाल्याने यातील 12 जणांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले. मात्र यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
बुराडीमधील कौशिक एन्क्लेव्ह परिसरातील ऑस्कर पब्लिक स्कूलजवळ ही दुर्घटना घडली. बुराडीचे आम आदमी पार्टीचे आमदार संजीव झा यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्यात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत. झा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत घटनास्थळी बचाव कार्य वेगाने राबवण्याची सूचना केली आहे. यातील जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Burari building collapse | Delhi: BJP MP Manoj Tiwari says, “… It was a 4-storey building and the construction was completed. The POP work for finishing was underway… As per the police reports, 20-22 people were trapped… 12 people have been rescued. The NDRF is at… pic.twitter.com/LsluvnCEm0
— ANI (@ANI) January 27, 2025
भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बुरारीमध्ये 4 मजली इमारत कोसळल्यानंतर शोध आणि बचाव कार्याची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज तिवारी म्हणाले की, “या चार मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. पोलिसांच्या अहवालानुसार, 20-22 लोक अडकले होते. यातील 12 जणांची सुटका करण्यात आली आहे. NDRF घटनास्थळी आहे. यात एका मुलीची प्रकृती गंभीर असून उर्वरित लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते धोक्याबाहेर आहेत. मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 4 मजली इमारत कोसळली, यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. यात जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही. पण सध्या आमचे प्राधान्य सर्व लोकांना वाचवणे आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी तिवारी यांनी दिली होती.
दरम्यान, दिल्लीतील बुरारी भागातील कौशिक एन्क्लेव्हमधील एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. ही इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात येत होती. इमारत बांधण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हेही वाचा:





