स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार होणार

पुणे – राज्यातील कृषी मालाची निर्यात वाढावी यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाच्यावतीनेसुद्धा स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार करण्यात येत आहे. राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनासुद्धा निर्यात प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठीच हे धोरण तयार करण्यात येत असल्याचे कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच कृषी निर्यात धोरण समितीचे सदस्य सुनील पवार यांनी सांगितले.
कृषी निर्यात धोरण तयार करणे याबाबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नंतर त्यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयातदार देश आणि आयातीलसाठी बदलवित असलेले निकष उत्पादक शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचवून निर्यातमधील अडथळे दूर करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात येत आहेत.
कृषी माल निर्यातीसाठी नवनवीन देशांच्या बाजारपेठा शोधणे कृषी माल निर्यातीसाठी उपलब्ध सोयीसुविधांचा वापर करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आघारित सुविधांची उभारणी आणि निर्यातीच्या दृष्टिकोनातून विविध कामांसाठी संस्थात्मक कार्यपद्धती अवलबणे कृषी माल निर्यातीत संबंधित घटकांसाठी कौशल्य विकास ही उद्दिष्टे कृषी निर्यात धोरण तयार करीत असताना ठेवण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.





