दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचे बेमुदत उपोषण

नवी दिल्ली – देशात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्याच्या निषेधार्थ दिल्ली महिल आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी जंतर मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सहा महिन्यांच्या आत बलात्कारातील दोषींना फाशी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हैदराबादेत झालेल्या “रेप ऍन्ड मर्डर’ प्रकरण आणि राजस्थानात सहा वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर मालिवाल यांनी उपोषण सुरू केले आहे. बलात्कारातील गुन्हेगारांना दोषी ठरवल्यापसून सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले आहे, असे मालिवाल यांनी सांगितले. गेल्यावर्षीही मालिवाल यांनी 10 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या आता फाशीची शिक्षेची तरतूद असलेल कायदा सरकारने केला. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. कायद्याची अंमलबजावणी व्हावी, अशी विनंती आपण पंतप्रधानांना केल्याचेही त्यांनी सांगितले.
Swati Maliwal, Delhi Commission for Women (DCW) Chairperson continues her hunger strike at Raj Ghat, demanding death penalty for convicts in rape cases within 6 months. #Delhi pic.twitter.com/4EydYR3PoY
— ANI (@ANI) December 4, 2019
दयेच्या याचिकेवरील निर्णय निश्चित कालमर्यादेमध्ये घेण्यात यावा, अशीही आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात 66 हजर पोलिस आणि राजधानी दिल्लीमध्ये 45 जलदगती न्यायालयांची कमतरता आहे. कायद्याची अधिक चांगली अंमलबजावणी व्हावी, यासाठीच्या सुविधा वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.




