Nepal Flood Viral Video : महापूरच्या तांडवातील अद्भुत क्षण! जीव वाचवण्यासाठी धडपड अन् ते एक घर भक्कमपणे उभं
Nepal Flood Viral Video : महापुराच्या रौद्ररूपात भक्कम उभं राहिलेल्या त्या घराची चर्चा

Nepal Flood Viral Video : नेपाळमध्ये आलेल्या महापुराने हाहाकार माजला आहे. अचानक आलेल्या या महापुरामुळे मोठी जीवतहानी झाली आहे. या पुरामुळे आतापर्यंत ४८९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून १२०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध नेपाळ सरकारकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
महापुरामुळे इमारती, गावच्या गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या पुरामध्ये नेपाळच्या चीन आणि तिबेट सीमेलगतच्या भागातील अनेक इमारती उद्ध्वस्त झाले. या घटनेचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाद्वारे समोर येत आहे. पण या मृत्यूच्या महातांडवात एक असा क्षण घडला, ज्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
CNG Price : महागाईचा फटका ! सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ; जाणून घ्या नवे दर
इंजिनिअरला बक्षीस देण्याची मागणी
महापुरात एका घराने सर्वांना आश्चर्यचकित करत पुराचा हा भीषण तडाखा सहन केला. या घरात अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. मात्र पुराच्या तांडवातून हे घर सुखरूप वाचल्याने अनेकजण चकित झाले आहेत, इतकेच काय तर लोक इंजिनिअरचं कौतुक करत आहे. भोटे कोशी नदीच्या काठी चिखल आणि ढिगाऱ्याच्या विनाशकारी प्रवासातून हे घर वाचवणाऱ्या इंजिनिअरला बक्षीस दिले पाहिजे, अशी मागणी सोशल मीडिया युजर्स करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
दोन मिनिटांच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये भीषण पुरामध्ये फिकट निळ्या रंगाचे दोन मजली घर उभे असलेले दिसते. या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत अडकलेले दिसत आहेत. या घराला चिखल आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाने त्याला चारही बाजूंनी वेढा घातला होता.
घराच्या भोवती ज्या प्रकारे पाण्याच्या लाटा उसळत होत्या, महापूर आपल्यासोबत मोठे दगड, कचरा आणि सिमेंटचे पत्रे वाहून आणत होता. या सर्व गोष्टी त्या उभ्या असलेल्या घराला आदळत होत्या. ते पाहून हे घर ढिगाऱ्याखाली गाडले जाईल असे वाटत होते, पण अखेर हे घर या पुराला तोंड देण्यात यशस्वी ठरले. घराच्या चारही बाजूंनी चिखल आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह असूनही हे घर ढासळलं नाही. यामुळेच याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पुराचे पाणी ओसरल्यानंतरचे व्हिडिओही समोर
हे घर ढिगाऱ्यात अडकलेले असतानाचे आणि नंतर पुराचे पाणी ओसरल्यानंतरचे व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये घराचा खालचा मजला पूर्णपणे चिखलाच्या ढिगाऱ्याने वेढला गेला असल्याचे स्पष्ट दिसते. सोशल युजर्सच्या मते, या महापुरात घडलेला हा एक चमत्कारच आहे. या घरात राहणाऱ्या कुटुंबाचा जीव वाचणे हा खूप मोठा दिलासा आहे.
The engineer who designed that house’s column structure deserves a national medal.
pic.twitter.com/PQgORN5LVq— Rishi Bagree (@rishibagree) August 28, 2026
दरम्यान, नेपाळ-तिबेट सीमेवरील या महापुराने रसुवा जिल्ह्यासह अनेक भागांना मोठा फटका बसला आहे. भोटे कोशी नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. परंतु महापुराच्या रौद्ररूपात सर्व काही वाहून जात असताना या घराची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. Nepal Flood Viral Video
हेही वाचा:
CNG Price : महागाईचा फटका ! सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ; जाणून घ्या नवे दर





