स्वस्तात सोने देण्याचा बहाणा; फसवणूक करणारे जेरबंद
Updated On:

कापूरहोळ -स्वस्तात एक किलो सोने मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या तिघांना राजगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. याबाबत श्रीराम मनोजकुमार आसावा यांनी फिर्याद दिली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास फसवणुकीतील आरोपी हे भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत वडमुखवाडी रोडच्या बाजूला लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळाली.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ छापा टाकत राजा राणुसिंग ऊर्फ टारझन आदिवाशी, रसालु कमलेश आदिवाशी, बिरकीस खंदेलाल आदिवाशी (सर्व रा. हरद्वा गाव, कटणी, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास राजगड पोलीस तपास करीत आहेत.





