Baramati : दसरा-दिवाळीनिमित्त सुप्रीम फर्निचर्सची भन्नाट ऑफर
Baramati : दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने घराचे नूतनीकरण, नवीन घराची सजावट तसेच कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

बारामती : दसरा आणि दिवाळी या सणांच्या आनंदात ग्राहकांना खरेदीचा दुहेरी आनंद देण्यासाठी एमआयडीसी, बारामती येथील सुप्रीम फर्निचर्सने ‘भन्नाट ऑफर’ जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत कोणत्याही फर्निचरच्या खरेदीवर ग्राहकांना १० टक्के सवलत मिळणार असून, त्याच रकमेचे साडी कूपनही देण्यात येणार आहे. ही ऑफर १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उपलब्ध असणार आहे.
सुप्रीम फर्निचर्सचे संचालक हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. सुप्रीम फर्निचर्सच्या या विशेष उपक्रमामुळे ग्राहकांना फर्निचर खरेदीबरोबरच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्याचीही संधी मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत मिळणाऱ्या कूपनचा उपयोग ग्राहकांना बारामतीतील प्रसिद्ध सम्यक लाइफस्टाइल, भिगवण रोड येथून साड्या, शर्ट, पँट, ट्राउझर्स किंवा ड्रेस मटेरियल खरेदी करण्यासाठी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना फर्निचरवरील १० टक्के सवलतीसोबतच त्याच रकमेची आपल्या पसंतीची खरेदी करता येणार आहे. सणासुदीच्या काळात घरासाठी नवीन फर्निचर खरेदी करताना स्वतःसाठी किंवा कुटुंबीयांसाठी कपड्यांची खरेदी करण्याचा आनंदही ग्राहकांना घेता येईल.
भव्य शोरूममध्ये फर्निचरची विस्तृत रेंज
सुप्रीम फर्निचर्सच्या एमआयडीसी, बारामती येथील तब्बल १८ हजार चौरस फुटांच्या भव्य शोरूममध्ये सोफा सेट, डायनिंग टेबल, डायनिंग चेअर्स, टिपॉय, गार्डन सेट, ऑफिस चेअर्स, व्हिजिटर चेअर्स, बेड, वॉर्डरोब, टीव्ही युनिट्स, मल्टियुटिलिटी कॅबिनेट्स, फोल्डिंग स्टडी टेबल्स आणि ऑफिस टेबल्स अशा विविध प्रकारच्या फर्निचरची मोठी रेंज उपलब्ध आहे. विशेषतः दिल्लीच्या प्रसिद्ध अल्डर (Alder) फर्निचर ब्रँडच्या विविध उत्पादनांची आकर्षक श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने घराचे नूतनीकरण, नवीन घराची सजावट तसेच कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
ग्राहकांना दर्जेदार फर्निचर खरेदीचा आनंद मिळावा आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडीच्या कपड्यांची खरेदी करण्याची संधीही मिळावी, या उद्देशाने आम्ही ही भन्नाट ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांनी १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुप्रीम फर्निचर्सच्या शोरूमला भेट देऊन या विशेष ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्यावा,” असे आवाहन सुप्रीम फर्निचर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
-हर्षवर्धन पाटील, संचालक
सुप्रीम फर्निचर्स, एमआयडीसी, बारामती





