मिरवणुकीदरम्यान मेस्सी थोडक्यात बचावला; ‘ती’ चूक बसमध्ये बसलेल्या खेळाडूंसाठी ठरली असती काळ

ब्युनोस आयर्स – विश्वकरंडक विजेत्या अर्जेंटिना संघाच्या खेळाडूंची बसमधून मिरवणूक सुरू असताना एक मोठी दुर्घटना टळली व कर्णधार लिओनेल मेस्सी ( Lionel Messi )सह अन्य खेळाडूही थोडक्यात बचावले. ही बस चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जात असताना रस्त्यावरील खांबावर लावलेली वीज प्रवाहाची तार खेळाडूंच्या डोक्याला लागून मोटा अनर्थ घडला असता. मात्र, खेळाडूंनी ही तार पाहिल्यावर गोंधळून न जाता तारेला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत आपला जीव वाचवला.
INDvsBAN | मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; बांगलादेशविरुद्ध उद्यापासून दुसरा कसोटी सामना
कतारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यावर अर्जेंटिनाचा संघ मायदेशात दाखल झाला. तेव्हा मेस्सीसह सर्व खेळाडू बसमधून लाखो चाहत्यांना अभिवादन करत होते. हे खेळाडू बसमध्ये बसवण्यात आलेल्या डेकवर बसले होते. त्याचवेळी विजेची तार आड येत असल्याचे लक्षात आले व खेळाडू बावरले होते. काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, हेच यातून सिद्ध झाले.
INDvsBAN | मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; बांगलादेशविरुद्ध उद्यापासून दुसरा कसोटी सामना
हा जल्लोष सुरू असताना या तारेतून वीजप्रवाह वाहत असला तरीही त्यावर आवरण चढवलेले असल्याने खेळाडूंना त्याचा स्पर्श झाला असता तरीही कोणतीही अनुचित घटना घडली नसती असे त्यांच्या वीज मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, विजेचा धक्का बसला नसता, पण या तारेपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात हे खेळाडू बसमधून खाली पडले असते, तरीही त्यांना दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे आता चाहत्यांनीही अशा तारा इतक्या कमी उंचीवर का लावल्या जातात, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
खेळाडूंना एअरलिफ्टही केले
बसमधून ही मिरवणूक पुढे जात असतानाच काही प्रेक्षकांनी बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. तसेच काही खेळाडूंनी प्रेक्षकांनाही जरा जास्तच प्रोत्साहित केले. त्यामुळे खेळाडूंनाही धोका होऊ शकतो हे लक्षात आल्यावर तेथील सरकारच्या सुरक्षा यंत्रणेने हेलिकॉप्टरला पाचारण केले व बसमधून मेस्सीसह सर्व खेळाडूंना एअरलिफ्ट केले व सुरक्षित स्थळी नेण्यात आले.





