एमी जॅक्सनने गुपचुप उरकला साखरपुडा; बॉयफ्रेंडसोबतचे स्वित्झर्लंडमधील फोटो केले शेअर

Amy Jackson: बॉलीवूड अभिनेत्री एमी जॅक्सन नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. आता पुन्हा एकदा ती तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने गुपचुप बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत साखरपुडा उरकला आहे. तिने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये एमी जॅक्सन तिचा बॉयफ्रेंड एड वेस्टविकसोबत रोमँटिक झाल्याचे दिसत आहे. स्वित्झर्लंडच्या सुंदर व्हॅलीमध्ये एडने एमीला एंगेजमेंट रिंग घातली. एमीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये एड वेस्टविक एमी जॅक्सनसमोर गुडघ्यावर बसलेला आणि तिचा हात हातामध्ये धरलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे बघत पोझ देताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये हे कपल एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. सध्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
एमी जॅक्सन बॉयफ्रेंड एडला डेट करण्यापूर्वी जॉर्जसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जॉर्जने जानेवारी 2019 मध्ये एमीला प्रपोज केले होते. यानंतर दोघे एकत्र राहू लागले आणि त्यादरम्यान अभिनेत्री लग्नाशिवाय एका मुलाची आई बनली, ज्याचा जन्म सप्टेंबर 2019 मध्ये झाला. मात्र, काही काळानंतर हे जोडपे वेगळे झाले आणि एमीने लग्नही केले नाही. यानंतर एड वेस्टविकने एमी जॅक्सनच्या आयुष्यात प्रवेश केला. 2022 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. आता दोघांची एंगेजमेंट झाली असून एडने एमीला प्रपोजही केले आहे.
एमीचा बॉयफ्रेंड एड हा हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि संगीतकार आहे. दरम्यान, एमी जॅक्सनने ‘सिंह इंज ब्लिंग’, ‘एक दीवाना था’, ‘फ्रीकी अली’, ‘रोबोट 2.0’ ‘क्रॅक’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत ती साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम करते.





