अमूल दूध महागले
Updated On:

नवी दिल्ली – गुजरात को- ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनतर्फे वितरित करण्यात येत असलेल्या अमूल दुधाच्या किमती प्रति लिटरला दोन रूपयांनी वाढविण्यात आल्या आहेत.
त्यामुळे इतर दूध उत्पादकही आगामी काळात दुधाच्या किंमती पुन्हा वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. महागाई निर्देशांक वाढत आहे. तरी आम्ही केवळ चार टक्क्यांनी दुधाच्या किमती वाढविल्या असल्याचे या संस्थेतर्फे सांगण्यात आले.
दीड वर्षापासून आम्ही दरवाढ टाळली होती. मात्र पॅकेजिंग, वाहतूक आणि इतर बाबींचा खर्च वाढल्यामुळे आता आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगण्यात आले.





