Amruta Khanvilkar : घटस्फोटाच्या अफवांवर अमृता खानविलकर संतापली, थेट दिला कारवाईचा इशारा
Amruta Khanvilkar : सोशल मीडियावरचे दावे खोटे

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर तिचा पती अभिनेता हिमांशु मल्होत्रा वेगळे राहत असून ते लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याबाबतचे अनेक वृत्त, पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
मात्र वेगळे होण्याबाबत दोघांनीही कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती दिली नव्हती. त्यामुळे चाहत्यांचाही मोठा गोंधळ उडाला होता. परंतु अफवा उठल्यानंतर या सेलिब्रिटी कपलने कायदेशीर मार्ग अवलंबत थेट इशारा दिला आहे.
अमृता खानविलकरच्या टीमनं अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. अमृताने तिचा पती हिमांशु मल्होत्रासोबत तिच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवरुन एक संयुक्त पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत आहे.
View this post on Instagram
वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीचा मजकूर पसरवला जातोय
अमृता खानविलकरनं पोस्टमध्ये म्हटले की, “अधिकृत कायदेशीर निवेदन 10 ऑगस्ट 2026 पासून लागू… काही ऑनलाइन, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमृता खानविलकर आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीचा, मानहानीकारक आणि गोपनीयतेचा भंग करणारा मजकूर पसरवला जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे.”
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून बदनामी, अफवा किंवा खोटी माहिती प्रसारित केल्यास किंवा शेअर केल्यास, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अशा सर्व प्रकारांवर लक्ष ठेवलं जात आहे, त्याआधारे योग्य कायदेशीर कारवाईसाठी त्याची नोंदही केली जात आहे, कायदेशीर टीम अमृता खानविलकर…”, असं अमृतानं पोस्टमध्ये म्हटले आहे. याद्वारे दोघांनी स्पष्टीकरण देत सोशल मीडियावरचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. Amruta Khanvilkar
हेही वाचा:
Stock Market : शेअर बाजाराची आज मंद सुरुवात ; सेन्सेक्स केवळ २ अंकांनी वधारला





