amruta khanvilkar birthday: मराठी चित्रपटसृष्टीतील चंद्रमुखी अमृता खानविलकरचा वाढदिवस २३ नोव्हेंबरला असतो. वाढदिवसाला अजून दोन दिवस असतानाच तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिला एक खास गिफ्ट पाठवून तिचा दिवस अधिकच खास करून टाकला. अमृता आणि प्राजक्ता यांच्यातील मैत्री सर्वांना माहीत आहे. अनेक वर्षांपासून दोघींची छान मैत्री असून यंदा दोघी एकत्र केदारनाथ यात्रेलाही गेल्या होत्या. आता अमृताच्या वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने तिच्यासाठी Early Birthday Gift म्हणून स्वतःच्या ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडमधील दागिने पाठवले आहेत. अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून या सरप्राइजची झलक दाखवली आणि प्राजक्ताचे आभार मानले. ती म्हणाली, “माझं Early बर्थडे गिफ्ट… माझ्या लाडक्या प्राजूने पाठवलंय… Thank you so much darling! Love you… खूप प्रेम राणी!” अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी छाप पाडली आहे. उत्कृष्ट नृत्यकौशल्य आणि दमदार अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे. तर प्राजक्ता माळी अभिनेत्रीबरोबरच एक उद्योजिका म्हणूनही चमकत आहे. तिचा ‘प्राजक्तराज’ दागिन्यांचा ब्रँड सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. अलीकडेच प्राजक्ता आणि अमृता दोघीही ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या प्रीमियरला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. दोघींच्या मैत्रीचा बंध नेहमीच प्रेक्षकांना भावतो. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अमृता ‘द ताज स्टोरी’ या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात झळकली. प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची निवेदिका म्हणून जबाबदारी सांभाळते आहे. तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटालाही यंदा अनेक पुरस्कार मिळाले.