Amritsar News : अमृतसर पोलिसांची कारवाई ! मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
अमृतसरमध्ये (Amritsar News) पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई करत दोन ग्रॅनेड, १२ पिस्तुल, ३३ जिवंत काडतुसे आणि ३१० ग्रॅम हेरॉईनसह एका टोळीच्या ११ सदस्यांना अटक केली आहे.

Amritsar News : अमृतसरमध्ये (Amritsar News) पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई करत दोन ग्रॅनेड, १२ पिस्तुल, ३३ जिवंत काडतुसे आणि ३१० ग्रॅम हेरॉईनसह एका टोळीच्या ११ सदस्यांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून १२ मॅगझिन आणि एक चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
रणजित एव्हेन्यू, छेहरटा आणि सुलतानविंड परिसरात राबवलेल्या या मोहिमेत (Amritsar News) अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. पोलीस आयुक्त हरमनबीर सिंग गिल, डीसीपी प्रभजोत सिंग विर्क आणि डीसीपी जसकरणजित सिंग तेजा यांनी पोलीस लाइनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बोबी (रा. निरंकारी कॉलनी, नवी आबादी), सम्याल सिंग (रा. चीमा खुर्द, तरनतारन), सतनाम सिंग उर्फ ठेकेदार (रा. रतन सिंग चौक), हरप्रीत सिंग उर्फ हॅपी भुंडी, आकाशदीप सिंग, आकाशदीप सिंग उर्फ आकाश (दोघे रा. नारायणगड, छेहरटा), समशेर सिंग उर्फ शेरा (रा. भिखीविंड), विशाल सिंग उर्फ कालू (रा. जंडियाला गुरु), गुरबीर सिंग उर्फ बिल्ला (रा. भिखीविंड) आणि इतर दोन अल्पवयीन मुलांचा (Amritsar News) समावेश आहे.






