अमृतपाल सिंह आज घेणार खासदारकीची शपथ ; जाणून घ्या काश्मीरचे रशीद इंजिनियर आणि यूपीच्या अफजलचे काय झाले?

Amritpal Singh । तुरुंगात कैद असणारा खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आज संसदेत खासदारकीची शपथ घेणार आहेत. त्याला आज आसामहून दिल्लीत आणण्यात येणार आहे. वारिस पंजाब दे संघटनेचे प्रमुख अमृतपाल हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत 9 साथीदारांसह आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेल्या अमृतपालला चार दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. याच दरम्यान ते लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमृतपाल सिंगला 5 जुलैपासून चार दिवसांसाठी कोठडीत पॅरोल देण्यात आला आहे. अमृतपालला आसाममधून ‘लष्करी विमानाने’ दिल्लीत आणले जाईल आणि नंतर परत तुरूंगातून घेऊन जाणार आहेत. अमृतपालला आणण्यासाठी पंजाब पोलिसांचे पथक आसाममध्ये पोहोचले आहे. पॅरोलच्या कालावधीत अमृतपाल कोणत्याही विषयावर मीडियाशी बोलू शकत नाही, मीडियाला संबोधित करू शकत नाही किंवा कोणतेही वक्तव्य देऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांच्या कुटुंबीयांनाही मीडियामध्ये कोणतेही वक्तव्य करता येणार नाही.
रशीद इंजिनिअरही आज घेणार शपथ Amritpal Singh ।
टेरर फंडिंगच्या आरोपाचा सामना करत असलेले शेख अब्दुल रशीद शुक्रवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथून खासदार निवडून आलेला रशीद दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्यांना ‘इंजिनिअर रशीद’ या नावानेही ओळखले जाते. रशीदला शपथ घेण्यासाठी दोन तासांचा कोठडी पॅरोल देण्यात आला आहे, ज्यामध्ये तिहार ते संसदेपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेचा समावेश नाही. पॅरोलच्या कालावधीत तो मीडियाशी कोणत्याही मुद्द्यावर बोलू शकत नाही, मीडियाला संबोधित करू शकत नाही किंवा कोणतेही वक्तव्य करू शकत नाही.
यूपीच्या अफजल अन्सारीचं काय झालं? Amritpal Singh ।
उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील सपा खासदार अफजल अन्सारी यांनी सोमवारी खासदार म्हणून शपथ घेतली. सभापती ओम बिर्ला यांनी अफझलला त्यांच्या संसदीय कार्यालयात शपथ दिली. लोकसभेत नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्यात अफझल अन्सारी यांना शपथ घेता आली नाही.
हेही वाचा
सुरजीत कौरचा यू-टर्न ! सकाळी ‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी घरवापसी





