अमृता सुभाष ‘जारण’नंतर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन

Parinati Marathi Movie | अभिनेत्री अमृता सुभाषची मुख्य भूमिका असलेल्या ‘जारण’ सिनेमा सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर आता अमृता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच तिच्या नव्या सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत दिसणार आहे.
‘परिणती – बदल स्वतःसाठी’ असे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून, यापैकी एक रंगीबेरंगी पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा जाणवतोय अशा लूकमध्ये पाहायला मिळतेय. तर दुसरी महिला साधेपणात गुंतलेली, कुशीत विसावल्याचं दिसतेय. या दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश स्वतःसाठी बदल घडवणं हा एकच आहे. Parinati Marathi Movie |
दरम्यान, अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी या लोकप्रिय अभिनेत्री पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहेत.
त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे. Parinati Marathi Movie |
हेही वाचा:





