नवाब मलिकांच्या आरोपानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…

मुंबई – नीरज गुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या काळातील वाझे असल्याचा खळबजनक आरोप आज राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आज निशाणा साधला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करून मोठे आरोप लावले आहे. मलिकांनी केलेल्या आरोपांवर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता फडणवीस यांनी मलिकांनी केलेल्या आपोनंतर ट्विट केले आहे. त्यामध्ये ”चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !” असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
मलिक यांना अमृता फडणवीस यांनी गायलेल्या रिव्हरअॅंथम गाण्याला आर्थिक सहाय्य केल्याचा दावा सुद्दा केला आहे. मलिकांच्या या आरोपांनतर आज राजकीय क्षेत्रात मोठा फटाका फुटल्याचे बघायला मिळाले आहे.
मलिकांच्या या खळबळजनक दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, दिवाळीच्या दिवशी मलिकांनी लवंगी फटाका लावला आहे. आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन असा जोरदार इशारा फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे दिवाळी नंतर फडणवीस नेमका कोणता बॉम्ब फोडणार आहेत. यासाठी वाट बघावी लागणार आहे.





