पुणे जिल्हा | रामभाऊ येळवंडेंना अमृत महोत्सवी मानपत्र

आळंदी, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्र आळंदी येथील प्रेरणा को-ऑप बँकतर्फे ज्येष्ठ नागरिक रामभाऊ तुकाराम येळवंडे यांना अमृत महोत्सवी मानपत्र पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी (दि. 23) हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणारे आणि बँकेच्या प्रगतीत, विकासात मोलाचा वाटा असणारे आपल्या सारखे ज्येष्ठ व्यक्तिमत्व,
आळंदीतील एक जुने व्यावसायिक सतत आमच्या पाठिशी उभे राहून आम्हाला प्रेरणा व प्रोत्साहन देत राहिले म्हणून आम्ही आपल्या आनंद सोहळ्याला द्विगुणीत करु इच्छीतो, असे गौरवोद्गार काढत मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आळंदी शहर भाजप अध्यक्ष किरण रामभाऊ येळवंडे, साई मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा शंकरराव रामभाऊ येळवंडे, तसेच संपूर्ण येळवंडे परिवार उपस्थित होता.





