Amravati : छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण; पालिका आयुक्तांवर शाईफेक

Updated On:
Amravati : छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण;  पालिका आयुक्तांवर शाईफेक

अमरावती : अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा प्रशासनाने हटविल्यापासून अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आक्रमक आहेत. यावरून राजकारण होत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. त्यातच आज अमरावती महापालिका आयुक्तांवर शाईफेक कऱण्यात आली आहे.

अमरावतीचे महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर  यांच्या अंगावर काही महिलांकडून शाईहल्ला करण्यात आला. यावेळी आयुक्त आष्टीकर यांना धक्काबुक्की करत पुतळा का हटवला याचा जाबही महिलांनी विचारला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे डॉ. आष्टीकर यांची सुटका करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी 12 डिसेंबर 2021 रोजी राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण त्यानंतर 16 डिसेंरला तो पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यातूनच आयुक्तांवर शाईफेक झाल्याचं समजत.

दरम्यान,  आयुक्तांवर शाई फेकली त्यांच्या पाठिशी आपण रहाणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोपही नवनीत राण यांनी केला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Amravati : सुवर्णकन्या कुमकुम मोहोडसह यशदिप भोगेचे जंगी स्वागत; अमरावतीत भव्य स्वागत रॅली

2026-10-05 11:59:33

Amravati : सुवर्णकन्या कुमकुम मोहोडसह यशदिप भोगेचे जंगी स्वागत; अमरावतीत भव्य स्वागत रॅली

Amravati Hospital Fire: "अमरावतीमधील दुर्घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले"; बावनकुळेंकडून पालकांचे सांत्वन अन् तपासाची ग्वाही

2026-08-24 11:15:20

Amravati Hospital Fire: "अमरावतीमधील दुर्घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले"; बावनकुळेंकडून पालकांचे सांत्वन अन् तपासाची ग्वाही

Amravati Hospital Fire : व्हेंटिलेटरचा स्फोट अन् नवजात बाळांच्या कक्षात धुराचे लोट; तीन बालकांचा दुर्दैवी शेवट, तर...

2026-08-24 09:03:30

Amravati Hospital Fire : व्हेंटिलेटरचा स्फोट अन् नवजात बाळांच्या कक्षात धुराचे लोट; तीन बालकांचा दुर्दैवी शेवट, तर...

अग्रलेख : अज्ञानाच्या जाळ्यात

2026-08-19 06:00:56

अग्रलेख : अज्ञानाच्या जाळ्यात

PMC News: महापालिकेत ठराविक ठेकेदारांसाठी मोर्चेबांधणी; शेकडो कोटींच्या निविदांवर राजकीय नेत्यांचा दबाव?

2026-08-06 07:00:25

PMC News: महापालिकेत ठराविक ठेकेदारांसाठी मोर्चेबांधणी; शेकडो कोटींच्या निविदांवर राजकीय नेत्यांचा दबाव?