नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर; थेट मुस्लिम सरदारांची यादीच केली ट्वीट

Amol Mitkari | मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी एका सभेत शिवरायांच्या सैन्यात एकही मुसलमान नव्हता, असे वक्तव्य केले. या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. राजकीय वर्तुळात देखील यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्ती करत, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य नको असे म्हणत त्यांना फटकारले होते. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी थेट शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार, अधिकारी, सैनिकांच्या नावाची यादीच ट्विट केली आहे.
माननीय मंत्र्यांनी वाचावे असे… pic.twitter.com/68ELwNokF1
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 12, 2025
आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स एक यादी पोस्ट केली आहे. या यादीमध्ये छत्रपती शिवराय यांच्या सैन्यामध्ये असलेल्या मुस्लिम सैन्याच्या नावांची यादी दिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मिटकरी यांनी कॅप्शनध्ये, माननीय मंत्र्यांनी वाचावे असे’, असे लिहिले आहे.
माहितीसाठी pic.twitter.com/HQkdVKttgF
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 13, 2025
छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत मुस्लीम सरदार
१) सिद्दी हिलाल: घोडदळातील सेनापती सहाव्यक
२) सिद्दी बाहबाद: घोडदळातील सरदार
३) सिद्दी इब्राहिम: शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा इजारी, फोड्यांचा किल्लेदार
४) नूरखान वेग: स्वराज्याचा पहिला सरनोबत
५) मदारी मेहतर: महाराजांचा विश्वासू सेवक
६) काझी हैदर: महाराजांचा वकील/ सचिव
७) शमाखान: सरदार
८) सिद्दी अंबर वहाब: हवालदार
९) हुसेनखान मियाना: लष्करात अधिकारी
१०) रुस्तमेजमान: महाराजांचा खास मित्र
११) दर्यासारंग: आरमाराचा पहिला सुभेदार
१२) इब्राहिम खान: आरमारातील अधिकारी
१३) दौलत खान: आरमार प्रमुख (सुभेदार)
१५) सुलतान खान: आरमाराचा सुभेदार
१६) दाऊल खान: आरमारातील सुभेदार
१७) इब्राहिम खान: तोफखाना प्रमुख
१८) विजापूर व गोवळकोड्यांतून स्वराज्यात आलेले 700 पठाण : पायदळ व घोडदळात
हेही वाचा:




