अमोल मिटकरी दिसणार आता नवीन भूमिकेत, थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार

Amol Mitkari | अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) फायरब्रँड नेते. आपल्या वक्तव्यांमुळे व विरोधकांवर सडकून टीका करण्यासाठी ते नेहमीच चर्चेत असतात. 2020 मध्ये पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. त्यानंतर 2024 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळणार का? अशी चर्चा देखील रंगली. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. मात्र, मिटकरी आता थेट गृहमंत्री होणार आहेत.
मंत्रिपद मिळाले नसले तरीही आता अमोल मिटकरी थेट गृहमंत्री होणार आहे. ही संधी त्यांना रुपेरी पडद्यावर मिळणार आहे. राजकारणात मंत्रीपद मिळालं नाही, पण रुपेरी पडद्यावर मात्र त्यांना थेट गृहमंत्रिपदाची संधी मिळालीय.
आमदार अमोल मिटकरी आता एका मराठी चित्रपटात गृहमंत्र्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. ‘बिल्लोरी’ या चित्रपटातून मिटकरी रील लाइफमध्ये ‘मंत्री’ होण्याचा अनुभव घेणार आहेत.
या चित्रपटात अमोल मिटकरी यांनी ‘आप्पासाहेब पाटील’ नावाच्या गृहमंत्र्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे निर्माते प्रशांत मानकर असून, दिग्दर्शनाची धुरा सुनिल शिरसाठ यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण 2024 मधील लोकसभा निवडणुकांच्या आधी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात पार पडलं होतं. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे.
राजकीय मंचावर अद्याप मोठी संधी न मिळालेल्या मिटकरींना, सिनेमा क्षेत्रात मात्र मोठी भूमिका मिळाली आहे. ‘बिल्लोरी’ या आगामी मराठी चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाचे प्रमोशन लवकरच सुरू होणार आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांना 2020 मध्ये विधानपरिषदेची आमदारकी मिळाली होती. आपल्या परखड भाषणशैलीसाठी ते ओळखले जातात. 2024 मध्ये राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. मात्र, अंतिम यादीत त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे ते मंत्रिपदापासून वंचित राहिले.
एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अजितदादांनी आमदार केलं हेच आपल्यासाठी त्यांचे कधीच न फिटणारे उपकार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती.





