‘कमळा’चा फोटो ट्वीट करत अमोल मिटकरींनी मोदी सरकारला काढला चिमटा

मुंबई – दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फुल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांसोबत विनोद, मस्ती करतात, चेष्टा करतात. आज ‘एप्रिल फुल्स डे’ असून या दिवसांच्या निमित्याने आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे.
जागतिक एप्रिल फुल दिवसाच्या निमित्ताने… pic.twitter.com/PT5d888DYn
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 1, 2022
ट्विटरवर अमोल मिटकरी यांनी ‘जागतिक एप्रिल फुल दिवसाच्या निमित्ताने….’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कमल अमोल मिटकरींनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांनी ‘एप्रिल फुल डे’च्या निमित्ताने मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ‘मोदी सरकारने जनतेला ‘एप्रिल फूल’ करत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले’ असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली आहे.





