Amol Mitkari : ‘विमानाची शेपटी पूर्णपणे सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळला?’; मिटकरींकडून सवाल उपस्थित
Amol Mitkari :
Amol Mitkari : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. रोहित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हेदेखील सातत्याने या अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. यातच आता मिटकरींनी विमानाच्या ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
अमोल मिटकरी यांची पोस्ट
‘विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाही,’ अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली.
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या… pic.twitter.com/RelNneoBxd
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 17, 2026
त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो.अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केला आहे. शेवटी त्यांनी पोस्टमध्ये #justice for Dada असेही म्हंटले आहे.
डेटा रेकॉर्डरमधील माहिती मिळवण्यात यश
बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या लिअरजेट ४५ विमान अपघाताच्या चौकशीने आता निर्णायक वळण घेतले आहे. या भीषण दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विमान अपघात तपास संस्थेने (एएआयबी) मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील (डीएफडीआर) माहिती यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आली आहे.
अपघाताच्या वेळी विमानाने पेट घेतल्यामुळे दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर (ब्लॅक बॉक्स) दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात होते, परिणामी त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, एएआयबीच्या प्रयोगशाळेत तांत्रिक कौशल्याचा वापर करून एल ३-कम्युनिकेशन्स कंपनीने तयार केलेल्या डेटा रेकॉर्डरमधील माहिती मिळवण्यात यश आले आहे. यामुळे अपघाताच्या वेळी विमानाची उंची, वेग आणि इंजिनची स्थिती काय होती, याची महत्त्वाची माहिती तपासाधिकाऱ्यांना मिळणार आहे.
हनीवेल कंपनीने तयार केलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डरची (सीव्हीआर) सध्या विस्तृत तांत्रिक तपासणी सुरू आहे. यातून वैमानिकांमधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येऊ शकते. मात्र, या रेकॉर्डरचे नुकसान गंभीर असल्याने, डेटा पुन्हा मिळवण्यासाठी विमान उत्पादन करणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिनिधींकडून आणि तांत्रिक तज्ज्ञांकडून विशेष मदत मागवण्यात आली आहे. दरम्यान, यातून आता काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Amol Mitkari
हेही वाचा :
Police Recruitment: खाकी वर्दीचे आकर्षण वाढले; उच्चशिक्षितांचा कल पोलीस दलाकडे…




