‘रावणाने बाप म्हणून सीतेचं अपहरण…’, अमोल मिटकरींचे खळबळजनक वक्तव्य

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज दसऱ्याच्या दिवशी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. रावणाने सीतेची वडिलांप्रमाणे काळजी घेतली.वनवासात सीतेला त्रास होऊ नये म्हणून सीतेच हरन केले, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
‘रावण राजा येवढा पवित्र आहे. त्याने त्रिजेटच्या सुरक्षेमध्ये सीतेला अशोक वनात सुरक्षित ठेवले. ती मुलगी आहे, लेक आहे. वनवासात सीतेचे हाल होतील. म्हणून एखाद्या बापाने एखाद्या मुलीची केलेली ती काळजी आहे. आदर्श पित्याचा आदर्श लंकेश्वराकडून घेतला पाहिजे, असे ते चरित्र पण कांदबरीकारांनी, इतिहासकारांनी ते विद्रुप केलं.’, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांनी केले आवाहन
दहन करायचे असेल दुरूस्ती करायची असेल तर अहंकार, अपप्रवृत्ती, स्वार्थीपणा दूर ठेवावेत. माझी सरकारकडे मागणी होती रावण दहन करणे चुकीची आहे. सांगोलासारखे गाव जिथे दहशनानाची पुजा केल्याशिवाय दसरा पार पडत नाही. या गावचा आदर्श देशाने घ्यावा महाराष्ट्राने घ्यावा, असे आवाहन देखील अमोल मिटकरी यांनी यावेळी केले.





