अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहिले पत्र; अभिनेत्रीचे केले कौतुक

Amitabh Bachchan Write Letter To Nimrat Kaur | बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. यादरम्यान अभिषेकचे अभिनेत्री निम्रत कौरसोबत अफेअर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या अफवांच्या दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला हाताने लिहिलेल्या पत्राचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांनी 2022 मध्ये निम्रत कौरच्या ‘दसवी’ चित्रपटातील अभिनयाबद्दल कौतुक करणारे पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी लिहिले होते की, “आमच्यामध्ये क्वचितच चर्चा किंवा भेट झाली. मी दिलेली शेवटची प्रशंसा YRF कार्यक्रमात कॅडबरीच्या जाहिरातीसाठी होती. पण ‘दसवी’ मधलं तुझं काम विलक्षण आहे, बारकावे, भाव, सारं काही! माझ्याकडून खूप खूप अभिनंदन, कौतुकास्पद. ” वास्तविक, अमिताभ बच्चन अनेकदा त्यांना ज्या कलाकारांची कामे आवडतात त्यांना हस्तलिखित पत्र पाठवतात. याआधी त्यांनी विकी कौशल आणि राधिका मदन यांसारख्या स्टार्सना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
;
निम्रत कौरनेही अमिताभ बच्चन यांचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत त्यांचे आभार मानले होते, पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, “18 वर्षांपूर्वी, जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवले तेव्हा मला वाटले होते की एक दिवस अमिताभ बच्चन यांना माझे नाव कळेल, आमची भेट आठवेल, माझ्या कामाचे कौतुक होईल. अनेक वर्षांनी मी चित्रपटात केलेल्या कामासाठी एक चिठ्ठी आणि फुले पाठवणार, हे सर्व मला दूरच्या स्वप्नासारखे वाटले.”
पुढे ती म्हणाली, “अमिताभ सर, माझे तुमच्यावर प्रेम आणि खूप धन्यवाद. आज शब्द आणि भावना दोन्ही कमी पडत आहेत. तुमचे हे प्रेमळ पत्र मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील आणि तुमच्या आशीर्वादाचा अनमोल सुगंध माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाट्यावर दरवळत राहील. तुमच्याकडून मिळालेल्या या स्तुतीमुळे मला शांतता जाणवते… तुमची मनापासून, सदैव कृतज्ञ, निम्रत.”
दरम्यान, एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा सुरू असताना निम्रत कौरला लिहिलेले पत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान निम्रतला याबाबत विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘मी काहीही करू शकते, पण लोक त्यांना हवं तेच म्हणतील. अशा प्रकारच्या अफवांना रोखणं इतकं सोपं नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देणं पसंत करते,’ असे तिने स्पष्ट केले होते.
हेही वाचा:





