IIM अहमदाबादमध्ये प्रवेशा मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांची नात नव्या झाली ‘ट्रोल’, कॉलेजच्या प्राध्यापकाने सांगितले ‘सत्य’

navya naveli । बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नातं नव्या नवेली नंदा नेहमीच चर्चेत असते. ती इंस्टाग्राम सक्रिय असून आपल्या लाइफचे अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने आयआयएम अहमदाबादमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. तिने सोशल मीडियावर यादरम्यानचे फोटो पोस्ट करत सर्वांना सरप्राईज केले.
Thanks, @rashi__pandey_, for saying so loudly.
The acceptance rate for this program is low, like others. Even if ppl want to discount her interview & CV. She, dammit, cleared the cut-off.
For a long time, India has been debating why elite families move out of India for higher… https://t.co/vj32H0Mvis
— Promila Agarwal (@promila_agarwal) September 2, 2024
नव्याने IIM अहमदाबादमध्ये एडमिशन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर कॉलेजच्या नावाने पोस्ट करत काही फोटो पोस्ट केले होते. आणि लिहिले होते,’सपने खरे होत असतात. पुढील २ वर्ष चांगले लोक आणि फैकल्टी बरोबर असणार आहे.’ तिच्या या पोस्टवर आता संमिश्र प्रतिक्रिया येत असून अनेकांनी तिला अभिनंदन केले असून सोशल मीडियावर काही युजर्सने तिला ट्रोल केले आहे. तिच्या पोस्टवर लोक कॅट परीक्षेतील मार्कांचा पुरावा तिच्याकडे मागत आहे. तर अनेकजण तिला विशिल्यावर प्रवेश मिळवला का असा प्रश्न विचारत आहे.
यावर आता IIM अहमदाबादच्या प्रोफेसरने ट्विटरवर सगळ्यांना नव्याच्या ॲडमिशनची सत्यता सांगितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत प्रोफेसरने तीला सपोर्ट केला आहे. मागील पाच वर्षांपासून IIMA Admission Test आणि वैध कॅट स्कोर हे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. यानंतर मुलाखतही घेतली जाते. या उत्तीण झाल्यास प्रवेश दिला जातो. त्यामुळे तिने पैसे देऊन प्रवेश मिळवलेला नाही तर कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
Nobody is allowed to troll IIMA students under my nose. If anyone has to troll them, it has to be IIMA.
Me toh khud underprivileged hu. I need Nifty to touch 50k to break-even 😂. It is sweet of PGPs to insist on paying for my masala dosa https://t.co/OOnji2GtCp
— Promila Agarwal (@promila_agarwal) September 3, 2024
प्रोफेसरने पुढे लिहिले,’तिने कट ऑफ क्लीयर केले आहे. भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा आहे की उच्च शिक्षण घेण्यासाठी श्रीमंत घरातील लोक परदेशात शिकायला का जातात. भारतातही शिक्षण घेऊ शकतात यावरून चर्चा रंगत होती. मात्र मोठ्या कुटूंबातीलच एका मुलीने या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. मी प्रोफेसर असतांना माझ्या आईआईमए स्टूडेंटला कुणीही ट्रोल करू शकत नाही. कुणालाच हा अधिकार नाही जर हा अधिकार कुणाला असेल तर तो फक्त नई फक्त आईआईमए लाच असणार आहे.





