अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली महाभारताची पुस्तके पण, ‘या’ कारणामुळे कारवी लागली लायब्ररीला दान

Amitabh Bachchan । अमिताभ बच्चन यांचा कल्की 2898 एडी हा चित्रपट कमाईचे नवे रेकॉर्ड बनवत आहे. चित्रपटात मुख्य अभिनेता प्रभासपेक्षा अमिताभ बच्चन यांचा अभिनय प्रेक्षकांन आवडत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये रंजक गोष्टी सांगितल्या आहे. शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी त्यांनी महाभारत विकत घेतले होते. याबाबत त्यांना जास्तीत जास्त जाणून घ्यायचे होते.
बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे विचार सविस्तरपणे लिहिले आहे की, ‘कल्की चित्रपटात विश्वाच्या उत्पत्तीपासून ते कल्कीच्या जन्मापर्यंत अनेक गोष्टी सुंदरपणे दाखविण्यात आल्या आहेत. पौराणिक कथांमध्ये कल्किचा जन्म आणि विश्वाची उत्पत्ती यावरही एक अध्याय आहे. ज्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती.’
बिग बी पुढे लिहितात, ‘आमच्या लेखांमधून बरेच काही शिकता येते, माझ्यासारख्या अशिक्षितांना शिक्षित करण्यासाठी जे काही करता येईल ते केले जात आहे. महाभारताचे अनेक खंड ज्ञान मिळवण्यासाठी मागवले होते, ते आल्यावर पुस्तक घरी ठेवण्याची अडचण होती. ते घरी ठेवले जात नाही. म्हणून ते मी लायब्ररीला दिले होते.’ असे मानले जाते की ज्या घरांमध्ये महाभारत ठेवले जाते, त्या घरातील सदस्यांमध्ये भांडणे होतात.
कल्की चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने 15 दिवसांत भारतात 543.45 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्याचे जगभरातील कलेक्शन 1000 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे.





