Amit Thackeray Speech: “…मी परत येतो”; भरसभेत अमित ठाकरे भाषणच विसरले
Amit Thackeray Speech: 'ते दगड चंपाच्या घरी पाठवा'

Amit Thackeray Speech: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उपस्थित राहिले होते. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान अमित ठाकरेंबाबत एक अनपेक्षित घटना घडली.
या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अमित ठाकरे भाषणच विसरले. भाषण सुरू असताना ते अचानक थांबले आणि “मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळाने ते पुन्हा व्यासपीठावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भाषण पूर्ण केले.
‘राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो’ (Amit Thackeray Speech)
अमित ठाकरे म्हणाले की, “ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो. हे मी खूप जाणूनबुजून बोलतो. मी दरवेळेस बोलतो. राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण ते प्रामाणिक आहेत.”

Amit Thackeray Speech: “…मी परत येतो”; भरसभेत अमित ठाकरे भाषणच विसरले
“मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की, तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते, तर मी राजकारणात टिकलो नसतो. जी आंदोलन आपण केली, ती आंदोलने आपण विसरली पाहिजेत, कारण राज्याची परिस्थिती बिकट आहे. नव्याने आपण सुरुवात केली पाहिजे. आणखी वेगळे प्रश्न आपण घेतले पाहिजेत. मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत अमित ठाकरे काही वेळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले आणि पुन्हा भाषणासाठी आले,” असेही अमित ठाकरे म्हणाले.
‘ते दगड चंपाच्या घरी पाठवा’ (Amit Thackeray Speech)
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, “मी पाठ करून आलेलो नाही. तुम्हा सर्वांना बघून धडकी भरली. आतापर्यंत केलेली कामं विसरून जा. यापुढे आपल्याला काय करायचे आहे हे लक्षात ठेवा. तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. राज्यात काय सुरू आहे? आपण भीषण परिस्थिती पाहिली आहे. चंद्रकांत पाटील चंपा काय बोलले? ते दगड चंपाच्या घरी पाठवा. केंद्रातला राजीनामा आणला, राज्यातला आणायला वेळ लागणार नाही.”
“दिल्लीतील आंदोलनातील एका विद्यार्थी होता, ‘मारा, मारा’ म्हणणारा. तो नागपूरचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या शहरातला आहे; पण मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलले नाहीत. आपण मतदान कशाला करता? विकास व्हावा म्हणून ना? चार वर्षे तुम्हाला मारतात आणि एक वर्ष तुम्हाला मलम लावतात. ज्याला तुम्ही मतदान करता, त्याने पाच वर्षांत काही केलं नाही, तर तुम्ही त्याला बदला,” असेही आवाहन अमित ठाकरे यांनी केले.
हेही वाचा:
Sanjay Raut : “हे कोण माफ करणारे?”; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर संजय राऊतांचा निशाणा





