‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “दहशतवादाला…”

Amit Shah on Operation Sindoor । जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीततब्ब्ल १०० किमी आत घुसून तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, या प्रत्युत्तरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत आणि भारतीयांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढनिश्चयी आहे.”असे म्हटले आहे.
Proud of our armed forces.#OperationSindoor is Bharat’s response to the brutal killing of our innocent brothers in Pahalgam.
The Modi government is resolved to give a befitting response to any attack on India and its people. Bharat remains firmly committed to eradicating…
— Amit Shah (@AmitShah) May 7, 2025
हल्ला कसा झाला? Amit Shah on Operation Sindoor ।
दरम्यान , मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचं, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचं आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचं मोठं नुकसान भारतानं केल्याचं स्पष्ट झालं आहे.





