अमेरिका युक्रेनला देणार; ‘एफ-16’ लढाऊ विमानांचे प्रशिक्षण

वॉशिंग्टन : अमेरिकेने युक्रेनच्या वैमानिकांना “एफ-16′ लढाऊ विमानांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी घेतलेल्या निर्णयाचे युरोपीय संघाकडून स्वागत करण्यात येते आहे.
बायडेन यांनी युक्रेनला “एफ-16′ विमाने देण्याबाबत घेतलेला निर्णय अमेरिकेत आणि अन्य मित्र देशांमधील नेत्यांशी सविस्तर चर्चा करून मगच घेतला गेला आहे. त्यामुळे या निर्णयाची घोषणा करण्यास बायडेन यांना थोडा जास्त अवधी लागला आहे.
“एफ-16′ विमाने असलेल्या मित्र देशांबरोबर अमेरिका युक्रेनला ही विमाने उपलब्ध करेल, असे सूतोवाच बायडेन यांनी गेल्या ठवड्यात “जी-7’च्या बैठकीत केले होते.
रशियाच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी अमेरिकेच्या बनावटीची ही विमाने मिळावीत, अशी आग्रही मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी अनेक आठवड्यांपूर्वीपासून लावून धरली होती. मात्र यामुळे युद्ध अधिकच भडकेल, अशी भीती वाटल्याने तशी घोषणा केली गेली नव्हती.
तसेच वैमानिकांना प्रशिक्षण देणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याचा दावाही केला जात होता. या शंकांचे निरसन करण्यासाठी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी गुपचूप युक्रेन आणि पोलंडला बेटही दिली होती.





