हायवेवर बंद पडली रुग्णवाहिका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताफा थांबवत धावले मदतीला

Updated On:

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल शनिवारी गडचिरोली दौरा होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते. अजित पवार यांनी सत्तेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती. हा दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील निवासस्थानी निघाले होते. मात्र त्यादरम्यान चुनाभट्टी – कुर्ला येथील पुलावर एक रुग्णवाहिका बंद पडली होती. हे पाहताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवला आणि मदतीला धावून गेले. यावेळी त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांचीही चौकशी केली.

रुग्णवाहिकेतील रुग्ण धर्मा सोनवणे यांचा अपघात झाला होता तसेच त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटकाही आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नाशिकहून मुंबईला आणण्यात आले होते. परंतु मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आल्याने रुग्णाला पुन्हा नाशिकला घेऊन जात असल्याचे नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने ठाणे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना फोन लावला आणि तात्काळ रुग्णाला दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरू करण्यास सांगितलं.

याव्यतिरिक्त धर्मा सोनावणे यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून केला जाईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवून आपली अडचण समजून घेऊन मदत केल्यामुळे धर्मा सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या कार्याचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : रिक्षा-टॅक्सी चालकांना अतिरिक्त वेळ दिला जाईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

2026-08-24 19:39:31

Devendra Fadnavis : रिक्षा-टॅक्सी चालकांना अतिरिक्त वेळ दिला जाईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

Newasa News : नेवाशात मोठी राजकीय घडामोड; आमदार लंघे-पाटलांना आठवलेंचा भक्कम पाठिंबा!

2026-08-24 17:06:50

Newasa News : नेवाशात मोठी राजकीय घडामोड; आमदार लंघे-पाटलांना आठवलेंचा भक्कम पाठिंबा!

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

2026-08-23 16:11:36

Devendra Fadnavis : "राहुल यांचा महिला सक्षमीकरणाचा मुद्दा ढोंगी" - देवेंद्र फडणवीस

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूरमध्ये Gen-Zसोबत संवाद; तरुणाईच्या प्रश्नांना दिले उत्तर

2026-08-23 14:46:46

Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा नागपूरमध्ये Gen-Zसोबत संवाद; तरुणाईच्या प्रश्नांना दिले उत्तर