पुणे जिल्हा | आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी जोपासली पाहिजे

माळेगाव (वार्ताहर) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले. दरम्यान, योगेश भोसले यांच्या पुढाकाराने उपस्थित ग्रामस्थांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याची शपथ घेतली. माळेगाव येथे बौद्ध विहारमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, दीपक तावरे, जयदीप तावरे,
अजित तांबोळी, ॲड. राहुल तावरे, संपतराव बनसोडे, प्रमोद तावरे, प्रताप सातपुते, नितीन तावरे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी भंन्ते प्रज्ञाबोधी यांनी पूजा पाठ व धम्मवंदना घेतली. यावेळी डॉ. प्रविण यादव, शिवाजी क्षीरसागर, चंद्रकांत वाघमोडे, प्रमोद जाधव, वसंतराव तावरे, मयुर भोसले, मॅडी ठोकळ, सिध्दार्थ खरात, रियाज शेख, रविराज तावरे यांनी मनोगत व्यक्त केले.
महोत्सवाचे आयोजन अध्यक्ष गणेश भोसले, अनिकेत भोसले, मिटु भोसले यांनी केले होते. माजी सभापती संजय भोसले, रुपेश भोसले, संतोष भोसले, विजय भोसले, केशव भोसले, दत्तात्रय भोसले, विश्वास भोसले, प्रा. किशोर भोसले, नरेंद्र भोसले, जयपाल भोसले, राजाभाऊ भोसले, निहाल भोसले यांनी सहकार्य केले.
दरम्यान, युवा शक्ती संघटना यांच्या वतीने नीरा -बारामती या मुख्य राजमार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात आले. यावेळी विशाल घोडके, सतीश जगताप, पिनु खरात, अमोल जगताप, अमोल भोसले व इतरांनी नियोजन केले होते. रमामाता नगर येथे आण्णा घोडके, संजय वाघमारे, किशोर शिंदे, संजय गायकवाड तर झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने दादा बाबर, हर्षद पवार, सुनील माने यांनी अभिवादन केले.
नगर पंचायत कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आदित्य भुतकर, सत्यवान गायकवाड यांनी अभिवादन करुन पाण्याच्या साठवण तलाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. माळेगांव पोलीस ठाणे, आयटीआय, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगांव कारखाना येथे अभिवादन करण्यात आले.





