Ambedkar Jayanti 2023 : बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पुण्यात 45 फुटी ‘जायंट बुद्धा’ची प्रतिकृती

Updated On:

पुणे – विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 123 वी जयंती जगभर या महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. भीमानुयायांकडून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने निरनिराळ्या समाजपयोगी, समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. तसेच महामानवाला वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक भीमानुयायी अभिवादन करताना आपण पाहतो.पुण्यातील दांडेकर पूल चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भीमजयंतीच्या निमित्ताने एक भव्य दिव्य असा देखावा उभारण्यात आला आहे

अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीने चायना मधील जायांट बुद्धाची (giant buddha, china) तब्बल 45 फूट उंच अशी भव्य दिव्य प्रतिकृती याठिकाणी साकारण्यात आली आहे. कलाकार संतोष आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून हि प्रतिमा साकारली आहे. चायना मधील या बुद्ध मूर्तीचं वैशिष्ट्य म्हटलं तर, हि मूर्ती डोंगर पोखरून एका शिल्पामध्ये तयार करण्यात आली आहे. हि एकमेव अशी जगातील सर्वात मोठी बुद्धांची प्रतिमा एकाश्म शिल्प म्हणून देखील ओळखली जाते तसेच वर्ल्ड हेरिटेज मध्ये या मूर्तीची नोंद देखील आहे.

चायना मधील या मूर्तीची प्रतिमा याठिकाणी कलाकार संतोष यांना साकारावी असं विचारलं असता त्यांनी ‘आज भारतात असणाऱ्या हजारो बौद्ध लेण्या आणि स्तूप आहेत सम्राट अशोकाने भारताच्या कानाकोपऱ्यात आणि जगभरात या उभ्या केल्या. ऐतिहासिक वारसा म्हणून जगभरात या लेण्यांच संगोपन होतंय तसेच त्यांचं जतन केलं जातंय. परंतु भारतात या लेण्यांवर अतिक्रमण झालं आहे त्यांचं विद्रूपीकरण तसेच तोडफोड झालेली आहे.

आज भारतात एकही लेणी किंवा स्तूप तिच्या मूळ स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हेच लक्षात घेऊन केंद्र सरकार असेल. आपलं अर्काइव्ह डिपार्टमेंट असेल यांना एक संदेश द्यायचा आहे कि, जर चायना मधील या बुद्ध मूर्तीच जर अशा पद्धतीनं जतन होत असेल तर आपण आपल्या देशातील मुर्त्यांचं आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गोष्टींचं जतन का जातं नाही करू शकत आणि यासाठीच हा देखावा याठिकाणी साकारण्यात आल्याचं संतोष यांनी सांगितलं.

कशी तयार झाली हि भव्य दिव्य प्रतिमा..
उंची 45 फूट, लांबी 60 फूट तर रुंदी 45 फूट अशी भव्य दिव्य बुद्धांची प्रतिमा साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. संतोष आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून गेल्या एका महिन्यापासून दिवस -रात्र एक करत हि प्रतिमा घडवली आहे. लोखंडी स्ट्रक्चर आणि पीओपी च्या माध्यमातून हा देखावा तयार करण्यात आला आहे. दांडेकर पूल चौकात हि प्रतिमा महिनाभर नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

जगामध्ये सर्वात मोठी जयंती ज्या महापुरुषाची साजरी केली जाते ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची. या निमित्ताने मोठा जल्लोष आणि उत्साह आपल्याला जगभरात पाहायला मिळतो विविध समाजप्रबोधनाचे कार्यक्रम यावेळी आयोजित केले जातात, मोठ्या मिरवणूक काढल्या जातात. या सर्वामध्ये बाबासाहेबानी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला ज्याच्यावर भारतीय रिसर्व्ह बँकेची स्थापना झाली त्या प्रबंधाला देखील 100 वर्ष पूर्ण होत आहेत.

आणि त्याच अनुषंगानं बाबासाहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे तसेच जागतिक वारसा असणाऱ्या या सर्व वस्तू आणि वास्तूचं जतन व्हावं या प्रमुख हेतून हा देखावा याठिकाणी साकारण्यात आला आहे. आपला जागतिक वारसा तसेच पुरातन वास्तू यांचं जतन केलं पाहिजे हा संदेश देण्यासाठी या देखाव्याचा सादरीकरण करण्यात आलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

2026-09-09 22:39:52

Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!

three-language policy : तीन-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप !

2026-09-09 22:39:23

three-language policy : तीन-भाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप !

Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा मोठा बदल! गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी मेट्रो; ‘या’ स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय

2026-09-09 20:01:47

Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा मोठा बदल! गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी मेट्रो; ‘या’ स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय

Nepal floods : नेपाळमध्ये पुराच्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन होणार; सात सदस्यीय संसदीय उपसमिती स्थापन

2026-09-09 19:58:21

Nepal floods : नेपाळमध्ये पुराच्या आर्थिक परिणामांचे मूल्यांकन होणार; सात सदस्यीय संसदीय उपसमिती स्थापन

Sugar Industry : सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; साखरेचे दर कमी होणार?

2026-09-09 19:50:31

Sugar Industry : सरकारचा मोठा निर्णय! 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू; साखरेचे दर कमी होणार?