माउंट एल्ब्रुसवर अंबादासची यशस्वी चढाई

मुंबई – औरंगाबादचा गिर्यारोहक अंबादास गायकवाड यांनी युरोपातील सर्वात उंच माउंट एल्ब्रुस या शिखरावर यशस्वी चढाई केली. अंबादास यांनी स्वातंत्र्यदिनी सकाळी 18 हजार 510 फूट उंचीच्या या शिखरावर तिरंगा फडकवला. अशी कामगिरी करणारे अंबादास महाराष्ट्राचे पहिलेच गिर्यारोहक ठरले.
आता पुढील वर्षी अंबादास दक्षिण अमेरिकेतील 23 हजार फूट उंचीचे आकोंकाग्वा शिखर सर करण्याची मोहीम फत्ते करणार आहेत. युरोपातील माउंट एल्ब्रुस सर केल्यानंतर मायदेशात परतल्यानंतर तिसऱ्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
या मोहिमेत ते दोन वेळा दरीत कोसळताना बचावले. हे शिखर समुद्रसपाटीपासून 18 हजार 510 फूट उंचीचे आहे. परतीच्या प्रवासादरम्यान बर्फाचा पाऊस व जोराच्या वाऱ्याचा वेग वाढतच होता.
अखेरीस गाइडने निघण्याचा निरोप सॅटेलाइट फोन, वॉकी-टॉकीवर दिला. वातारवरणाशी तसेच निसर्गाशी दोन हात करत अखेर अंबादास सहिसलामत सुखरूप परतले.





