“‘त्या’ 18 दिवसात वाल्मिक कराडने ‘हे’ महत्त्वाचं काम केलं” ; अंबादास दानवेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Ambadas Danve on Walmik Karad । बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पुण्यात आज बाळकडू वस्त्रहरण व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले त्यावेळी त्यांनी वाल्मिक कराड याच्या विषयी मोठा दावा केला.
१८ दिवसात मालमत्ता ट्रान्सफर केल्या Ambadas Danve on Walmik Karad ।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत. वाल्मिक कराड फरार होता तेव्हा त्यांनी यातच लक्ष दिलं. मालमत्ता ट्रान्सफर केल्या गेल्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट अंबादास दानवेंनी केला आहे. आम्ही राजीनामा पाहिजे, म्हणून भूमिका घेतोय, असंही अंबादास दानवेंनी सांगितले.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावर काय म्हणाले?
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरवर बोलताना अंबादास दानवे यांनी,”मी झिशान सिद्दीकी यांना भेटलो. ते म्हटले तपास चुकीच्या दिशेने जातोय. सरकारने नव्याने तपास करावा. जर सत्यता असेल तर नेता बिल्डर कोण होता?, फोन का केला होता?, याचा तपास करावा,” अशी मागणी केली. दरम्यान, एसटी दरवाढीवरुनही अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. एसटीच्या काचा निट नाहीत. एसटीच्या सिट व्यवस्थीत नाही. खासगीकरणाला वाव द्यायचा का?, तोटा सहन केला पाहीजे. महाराष्ट्रात आज आंदोलन होतंय. भ्रष्टाचार झालाय हे मी आधीच सांगितलं आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा
झिशान सिद्दिकींच्या जबाबावर संजय राऊत म्हणाले,”तुम्ही ज्यांची नाव घेत आहेत…”





