अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कंपनीतील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा झाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील कामगारांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या विषबाधेने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनसे आक्रमक मनसेचे पप्पू पाटील कंपनी व्यवस्थापकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याचे समजत आहे. विषबाधा झालेल्या महिलांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू अनेक महिलांना उलट्यांचा त्रास होत असून कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.