Aman Arora : …तर मी राजकारण सोडेन, अन्यथा तुम्ही राजीनामा द्या; मंत्री अमन अरोरा यांचे काँग्रेस आमदाराला आव्हान
पंजाब विधानसभेत बुधवारी राज्य सरकारच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये (Aman Arora) आणि विरोधी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.

Aman Arora : पंजाब विधानसभेत बुधवारी राज्य सरकारच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये (Aman Arora) आणि विरोधी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शहाकोट मतदारसंघातील एकाही व्यक्तीला गेल्या चार वर्षांत सरकारी नोकरी मिळाली नसल्याचा दावा करणारे काँग्रेस आमदार हरदेव सिंह लाडी शेरोवालिया यांचे आव्हान स्वीकारत पंजाबचे कॅबिनेट मंत्री अमन अरोरा (Aman Arora) यांनी थेट आमदाराला राजीनामा देण्याचे आव्हान दिले.
विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार शेरोवालिया यांनी दावा केला की, माझ्या शहाकोट मतदारसंघात २४३ गावे आणि ३ नगरपंचायती आहेत. तेथील एकही व्यक्ती मला सरकारी नोकरी मिळाली आहे, असा दावा करू शकत नाही.
यावर पलटवार करत मंत्री अमन अरोरा (Aman Arora) म्हणाले, तुम्ही वेळ आणि ठिकाण ठरवा, मी तुमच्या मतदारसंघात येतो. तिथे एक जाहीर सभा घेऊ. जर एकाही व्यक्तीने हात वर करून नोकरी मिळाल्याचे सांगितले, तर तुम्ही राजकारण सोडा; आणि जर कुणीच हात वर केला नाही, तर मी राजकारण सोडेन.
विधानसभेत बोलताना अरोरा यांनी गेल्या साडेचार वर्षांतील सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. त्यानुसार ६८,००० पेक्षा जास्त सरकारी नोकऱ्यांचे वाटप, १,८३,८३७ कोटींच्या गुंतवणुकीतून ६.३६ लाख नोकऱ्या, २२ लाखांहून अधिक तरुणांना रोजगारासाठी सहकार्य, जपानी कंपनीची गुंतवणूक गुंतवणूक ५०० कोटींवरून १,१०० कोटींवर गेल्याची माहिती देण्यात आली.
पहिल्यांदाच कौशल्य विकास मिशनसाठी बजेट वाढवून २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संगरूर जिल्ह्यात १०० कोटी खर्चून संत अत्तर सिंह महाराज आर्म्ड फोर्सेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटची स्थापना केली जात आहे, जिथे दरवर्षी ५०० तरुणांना लष्करात अधिकारी पदासाठी प्रशिक्षण दिले जाईल.
केंद्रीय आकडेवारीनुसार, १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारीचा दर २०२२ मधील १९.१% वरून २०२५ मध्ये १७% वर खाली आला आहे असेही अरोरा यांनी सांगितले. जगातील कोणतेही सरकार प्रत्येक नागरिकाला सरकारी नोकरीची हमी देऊ शकत नाही. उद्योग आणि रोजगारासाठी योग्य वातावरण निर्माण करणे हे सरकारचे खरे कर्तव्य आहे आणि आम्ही तेच करत आहोत अशी टिप्पणी (Aman Arora) त्यांनी केली.






