“सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल !” ; संतोष देशमुख प्रकरणात ‘त्या’ व्हिडीओने गोट्या गित्तेच्या नावाची चर्चा ; शरद पवार गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप

Jitendra Awad on Gotya Gitte । बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर सतत गंभीर आरोप होत आहेत. या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता उर्वरित मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारेकऱ्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच सुरु आहेत. त्यातच आता बीडमध्ये वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोट्या गित्ते याच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एका पोस्टचा दाखला देत गोट्या गित्ते आणि वाल्मिक कराडबाबत एक सनसनाटी दावा केला आहे.
एका आठवड्यात जामिनावर बाहेर Jitendra Awad on Gotya Gitte ।
वाल्मिक कराडच्या अत्यंत विश्वासू गोट्या गित्ते यानेच कराडच्या सांगण्यावरुन बापू आंधळेला गोळी मारली, असल्याचा धक्कादायक दावा आव्हाड यांनी केला. त्यासोबत जितेंद्र आव्हाड यांनी गोट्या गित्ते याच्या गुन्हेगारीचा पाढा वाचणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गोट्या गित्ते हा बीड जिल्ह्यात सर्रासपणे पिस्तुल विकायचा, असा दावा करण्यात आला आहे. बीडमध्ये प्रत्येकाच्या कमरेला बंदूक असायचे याचे श्रेय गोट्या गित्ते याचे असल्याचे यात म्हटले गेले आहे. हा माणूस गेली १० वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकत आहे. पूर्ण हाय एन्ड पिस्तूल विकतोय, हा एका आठवड्यात जामिनावर बाहेर येतो, असा दावा देखील या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
ह्या गोट्या गीते नि वाल्मिक नि सांगितल्या प्रमाणे बापू आंधळेला गोळी मारली https://t.co/avRfSr7Jo9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 8, 2025
गोट्या गित्ते अचानक चर्चेत का आला? Jitendra Awad on Gotya Gitte ।
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात खळबळ माजली होती. देशमुख यांना प्रचंड छळ करुन मारण्यात आले होते. यामध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या मारेकऱ्यांची प्रचंड चर्चा होती. या सगळ्यांनी लोखंडी रॉड, फायटर, कत्ती अशा धारदार हत्यारांनी देशमुख यांना जीवे मारले. या आरोपींच्या क्रूरपणाची चर्चा सर्वांचा माहिती झाली होती. अशातच गेल्या तीन दिवसांपासून अचानक गोट्या गित्ते हे नाव बीड जिल्ह्यात आणि सोशल मिडीयावर अचानक चर्चेत आले. यासाठी एक व्हिडीओ कारण ठरला आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ वाल्मिक कराड याला पुण्याहून बीडच्या केज येथे नेतानाचा असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यासोबत गोट्या गित्ते याची गाडीही असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोट्या गित्ते हा सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जाते. मग त्याची गाडी पोलिसांच्या ताफ्यासोबत का होती, याबाबतही सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.आता यावरून पुन्हा एकदा विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार असल्याचे म्हटले जात आहे.





