Alpha Film : आलिया भट्ट आणि शर्वरी वाघच्या ‘अल्फा’ चित्रपटाची टीझर डेट समोर
Alpha Film : 'अल्फा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले

Alpha Film : अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ आगामी ‘अल्फा’ (Alpha) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात पहिल्यांदाच इंडस्ट्रीतील दोन मोठ्या अभिनेत्री जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.वरिष्ठ ट्रेड अॅनालिस्टनुसार,’अल्फा’चा टीझर १० जून म्हणजेच बुधवारी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रोडक्शन हाऊसकडून जोरदार मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखली गेली आहे. चित्रपटाचे निर्माते आदित्य चोप्रा यांनी ‘अल्फा’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या टीमसह तगडी तयारी केली आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास रणनीती (Alpha Film)
आदित्य चोप्रा आणि त्यांची टीम ‘अल्फा’चे प्रमोशन अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहेत. ‘अल्फा’ हे केवळ एका पात्राचे किंवा चित्रपटाचे नाव नसून ती एक ‘विचारसरणी’ आहे, असा संदेश प्रेक्षकांमध्ये पोहोचवला जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना डोळ्यासमोर ठेवून विविध ॲक्टिव्हिटी केल्या जातील.
मुख्य अभिनेत्री शर्वरी आणि आलिया यामध्ये आधुनिक विचारसरणीचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. या चित्रपटात आलिया आणि शर्वरीला यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि शक्तिशाली रूपात दाखवले जाईल, जे प्रेक्षकांना आकर्षित करू शकते.
बॉबी देओल आणि अनिल कपूर दिसणार (Alpha Film )
या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी नेटफ्लिक्सवरील गाजलेली सिरीज ‘द रेल्वे मेन’चे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूर सारखे दिग्गज कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Alpha Film
आजच्या मुली आपलं भविष्य स्वतः घडवत आहेत आणि समाजाच्या अपेक्षा किंवा दबावांच्या चौकटीत अडकण्यास नकार देत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक मजेशीर, धाडसी आणि अॅटिट्यूडने भरलेली मोहीम पाहायला मिळणार आहे. मुलींना ‘अल्फा’ या संकल्पनेशी जोडण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आली आहे. Alpha Film
हेही वाचा:






