अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; समन्स पाठवताच चौकशीसाठी अभिनेता पोलीस ठाण्यात हजर

Allu Arjun | अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सुपरहिट ठरत आहे. एकीकडे असे चित्र असताना मागील काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या संकटात वाढ होत असल्याचे दिसत आहे. पुष्पा २ च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून हा सुपरस्टार वादात सापडला आहे.
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तरीही त्याला एक रात्र तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. यातच आता अल्लू अर्जुनच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
अल्लू अर्जुनला पुन्हा पोलिसांनी समन्स बजावले
आता अल्लूला पुन्हा पोलिसांनी समन्स बजावले आहे. आज सकाळी ११ वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यासाठी त्याला चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तो पोलिस स्टेशनच्या बाहेर त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसला. ज्याचा व्हिडिओ एएनआयने पोस्ट केला आहे.
पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. 8 वर्षीय बालकाला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun reaches Chikkadpally police station in Hyderabad to appear before the police in connection with the Sandhya theatre incident. pic.twitter.com/EjTvyN9eTi
— ANI (@ANI) December 24, 2024
तर हैदराबादमध्ये ‘पुष्पा 2’ च्या स्क्रिनिंगच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत काहींनी त्याच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. यावेळी त्यांनी अल्लू अर्जुनच्या विरोधात घोषणाबाजी करत पीडित महिलेच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. हे प्रकरण अद्याप निकाली निघाले नाही, तोपर्यंत आता पोलिसांनी अल्लू अर्जुनला समन्स बजावले आहे.
हेही वाचा:





