Ajit Pawar : अजितदादांच्या घातपातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांचा खळबळजनक आरोप
Ajit Pawar : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
Ajit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांनंतर सुनील तटकरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. (Ajit Pawar)
रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात होता का आणि त्यात सुनील तटकरे यांचा काही सहभाग होता का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. तसेच, तटकरे यांच्याबाबत टीका करताना त्यांनी दिवंगत नेते अंतुले यांचाही उल्लेख केला. कदम यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Ajit Pawar)
दरम्यान, अजित पवार यांचं विमान मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अपघातग्रस्त झालं. या दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. (Ajit Pawar)
कदम यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे. (Ajit Pawar)





