IAS महिलेशी संबंधांचा आरोप; गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय, खडसेंना थेट…

Girish Mahajan Vs Eknath Khadse | भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनीही मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यातच आता गिरीश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पत्रकार अनिल थत्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना गिरीश महाजन यांनी अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे. नोटिशीच्या माध्यमातून महाजन यांनी खडसे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत एकनाथ खडसे यांनी आपल्याला अजूनपर्यंत कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस आल्यावर प्रतिक्रिया देऊ, असं सांगितले.
गिरीश महाजन यांचे ओपन चॅलेंज
एकनाथ खडसे यांच्या दाव्यानंतर गिरीश महाजन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल. कोणालाही तोंड दाखवणार नाही. एका भोंदू पत्रकाराच्या हवाल्याने खडसे हे आरोप करत आहेत. मी बोलायला लोगलो तर त्यांना घरातून तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल. मला बोलायला लावू नका. तुमच्याच घरातील एक गोष्ट सांगितली तर तुमचं बाहेर पडणं अवघड होऊन जाईल, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला होता. Girish Mahajan Vs Eknath Khadse |
नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला होता. एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या रंगला रात्री अशा, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणं उचित होणार नाही.
अमित शाह यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते.या बैठकीत दिवसभरातून 100 वेळी तुमचे तिथे कॉल्स झालेले आहेत. हे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत, असे अमित शाह यांनी महाजनांना सांगितले होते,” असा दावा त्यांनी केला होता. Girish Mahajan Vs Eknath Khadse |
दरम्यान, या प्रकरणावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच या नोटिसला खडसे काय उत्तर देणार ते पहावे लागणार आहे.
हेही वाचा:





