वैष्णवी मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप; पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह? ‘हे’ पोलीस अधिकारी रडारवर…

Vaishnavi Hagavane death case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मृत्यू प्रकरणाच्या तपासावर पुणे पोलिसांनी अवघ्या १ मिनिटं ११ सेकंदात पत्रकार परिषद ओटोपली. यामुळे पुणे पोलिसाांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून आरोपींवर सौम्य कलम लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
वैष्णवीच्या मृत्यू हगवणे कुटुंबातील लोकांमुळे झाल्याचा आरोप तिचे वडील अनिल कस्पटे यांना केला आहे. मुलीचा अतोनात छळ हगवणे कुटुंबातील लोकांना केल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हगवणे हिने देखील सासऱ्याच्या लोकांवर गंभीर आरोप करत आपलाही छळ झाल्याचे म्हटले आहे. यामुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मोठ्या सुनेच्या तक्रारची दखल घेतली नाही
हगवणे यांची मोठी सुन मयुरीने नोव्हेंबर २०१४ मध्ये पौड पोलिसांत मारहाणीची तक्रार केली होती. पण गुन्हा दाखल होऊनही कारवाई करण्यात आली नाही, असे मयुरीचे म्हणणे आहे. तर वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाची देखील सहा दिवस अबाळ झाली. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलिस तपासाबाबत प्रश्नचिन्ह
१६ मे रोजी वैष्णवीने मुळशी तालुक्यातील भुक्कम या गावात सासरच्या घरी आत्महत्या केली. यानंतर १७ मे रोजी राजेंद्र हगवणे फरार झाला, त्यानंतर तो औंध येथील रुग्णालयात देखील आला होता. पण त्याला अटक करण्यात आली नाही. २० मे रोजी बाळाचा ताबा मिळविण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांनी वारजे पोलिसांत धाव घेतली. पण त्यांची तक्रार पीआय विश्वजीत कायंगडे यांनी घेतली नाही. या प्रकरणात निलेश चव्हाण या व्यक्तीचे देखील नाव समोर आली असून त्याच्यावर देखील बाळाच्या अपहरणाचा गुन्हा अद्यापर्यंत दाखल करण्यात आला नाही. यामुळे पुणे पोलिसांच्या तपासाबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे पोलिस अधिकारी रडारवर
1. पीआय विश्वजीत कायंगडे
2. पीआय विजय विभुते
3. पीआय संतोष गिरी गोसावी
4. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड
5. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
6. IG जालिंदर सुपेकर





