Allah Ghazanfar Expensive : मुंबईचा युवा खेळाडू पदार्पणातचं ठरला महागडा, पहिल्याच सामन्यात केली नकोशा विक्रमाची नोंद
Allah Ghazanfar Expensive : वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात धावांचा पाऊस पडला.

Allah Ghazanfar expensive IPL Debut : आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात एमआय विरुद्ध केकेआर आमनेसामने आले होते, ज्यात मुंबईने कोलकाताचा पराभव करत यंदा विजयाने श्रीगणेशा केला. मात्र, मुंबईच्या एका युवा खेळाडूसाठी हा सामना एखाद्या विदारक स्वप्नासारखा ठरला.
मुंबईने ४.८० कोटींची बोली लावून संघात घेतलेल्या अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफरच्या नावावर पदार्पणातच एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू अल्लाह गझनफर याच्यासाठी हा सामना विसरण्याजोगा ठरला. आयपीएलमध्ये पदार्पण करताना गझनफरने ‘दुसरा सर्वात महागडा स्पेल’ टाकण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
केकेआरच्या फलंदाजांनी गझनफरची केली धुलाई
😭😭😭 afghanistan mystery spinner allah ghazanfar completed half century in 24 balls pic.twitter.com/XcdjtpaR44
— CRICitism (@CRICitism) March 29, 2026
लिलावात ४.८० कोटी रुपये मोजून मुंबईने गझनफरला आपल्या ताफ्यात सामील केले होते. मात्र, केकेआरविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो पूर्णपणे दिशाहीन दिसला. त्याने आपल्या ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये ५१ धावा खर्च आणि त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याची इकॉनॉमी १२.८० इतकी राहिली. आयपीएल पदार्पणात सर्वात महागडा स्पेल टाकण्याचा विक्रम प्रयास रे बर्मन (५६ धावा,२०१९) याच्या नावावर आहे, ज्याच्या अगदी जवळ गझनफर पोहोचला.
Bosch can do better than Allah Ghazanfar with the ball on flat Wankhede. Plus a decent batter.
It’s cringe and gives me second hand embarrassment that “this” is his thing now.
Please please, play Corbin Bosch in the next Wankhede match @mipaltan https://t.co/gqib3odE8Y
— Strike1andout (@Strike1AndOut) March 30, 2026
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने अजिंक्य रहाणे (६७ धावा) आणि अंगकृष रघुवंशी (५१ धावा) यांच्या जोरावर २२० धावांचा डोंगर उभा केला होता. मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांनाही वानखेडेवर संघर्ष करावा लागला; बुमराहने ३५ तर हार्दिकने ३९ धावा खर्च केल्या.
मात्र, २२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने ७८ धावांची तर रयान रिकेल्टनने ८१ धावांची तुफानी खेळी केली. या दोघांच्या १४८ धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे मुंबईने १९.१ ओव्हरमध्येच हे लक्ष गाठले. हार्दिक पंड्याने नाबाद १८ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.





