ऑल द बेस्ट ! दहावीच्या परीक्षेचा आज निकाल; विद्यार्थींची धाकधूक वाढली

10th SSC Result | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे. ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाईल.
त्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून ज्यात निकालाची आकडेवारी जाहीर केली जाईल. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बारावी परीक्षेच्या निकालानंतर दहावीच्या निकालीची प्रतिक्षा होती. अखेर ती संपली असून आजच्या निकालाकडे विद्यार्थांचे लक्ष असणार आहे.
यंदा राज्यातून यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
कसा पाहाल निकाल –
– mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.
– होम पेजवर ‘ ‘SSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा.
– निकाल तपासण्यासाठी रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
– दहावीचा निकाल गुणांसह तुम्हाला पाहायला मिळेल.
– येथून तुम्ही निकालाची पीडीएफ फाईल डाऊनलोड करु शकता.
हेही वाचा :
Buldhana Accident: बुलढाण्यात कार आणि ट्रकची जोरदार धडक; तिघांचा जागीच मृत्यू





